लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांचे पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील निवती श्रीरामवाडी झुलत्या पुलाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू आहे. दोन वर्षे पूर्ण झाली तरी फक्त दोन पिलर ते सुद्धा अर्धवट बांधलेले आहेत. तरी सदर ठेकेदाराला ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने लोकप्रतिनिधींनी मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या कडे भेट घेऊन केली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य यज्ञा साळगावकर, निवती सरपंच अवधूत रेगे, पंचायत समिती सदस्य आपी फणसेकर, नगरसेवक दाजी परब आणि श्रीरामवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.












