उपसरपंच सचिन ओक यांचा विशेष पाठपुरावा
गुहागर प्रतिनिधी:
गुहागर तालुक्यातील कोतळूक ग्रामपंचायत कार्यालयात एस. टी. सवलतीचे NCMC स्मार्ट कार्ड काढण्यासाठी नागरीकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला.
गुहागरमध्ये जाऊन आपल्या गावातील नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सचिन ओक यांनी एजन्सीवाले श्री मोरे यांना हे शिबीर गावातच घेण्यासाठी विनंती केली होती त्यानुसार हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात १८० जणांनी नोंदणी करून कार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी सरपंच प्रगती मोहिते, उपसरपंच सचिन ओक, ग्रामपंचायत अधिकारी कमलाकर शिरकर, डाटा एंट्री ऑपरेटर समीर ओक, कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर उपस्थित होते. शिबीर यशस्वी होण्यासाठी कोतळूक ग्रामपंचायत, ग्रामस्थ, महिला मंडळ, बचत गट यांनी प्रयत्न केले.












