विसापूर येथे लोकसभागातून जलधारा योजना 

गुहागर प्रतिनिधी :

शासनाच्या लोकसहभागातून ‘ पाणी अडवा पाणी जिरवा , भुजल वाढवा ,या मोहिमेनुसार निर्मल ग्रामपंचायत विसापूर येथिल नवतरुण विकास नाट्य मंडळ पहिली वाडी यांच्यावतीने जलधारा योजना राबविण्यात आली.

या मध्ये प्रत्येकी एक, एकर जागेवर एक शोषखड्डा मारण्यात आला. उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या झळा कमी व्हाव्यात यासाठी हा उपक्रम अतिशय स्तुत्य मानला जात आहे. विशेष म्हणजे लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला असल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

यावेळी नरेश वेद्रे,पांडूरंग वेद्रे,रामचंद्र धोपट,प्रभाकर धोपट,यांच्या जमिनीमध्ये शोषखड्डे मारण्यात आले . यावेळी माजी सरपंच काशीराम खाकम,वाडी अध्यक्ष नरेश वेद्रे,वाडी प्रमुख संजय नवरत, देवेंद्र नवरत,रमाकांत सुवरे,अनिल वेद्रे, दत्ताराम नवरत,मंगेश वेद्रे, राजेश वेद्रे,शांताराम वेद्रे गणेश धोपट, मिलिंद खाकम,अजित वेद्रे, सावित्री गिजे ,शेवंती वेद्रे,रुक्मीणी पारदळे,तसेच मुंबई रहिवाशी व ग्रामस्थ उपस्थित होते.