आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शीळ बाईतवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना:- आमदार किरण सामंत

राजापूर (वार्ताहर): शहरानजीकच्या शीळ गावातील अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ व विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत लांजा-राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे राजापूर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद आणखी वाढल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.
या प्रवेश सोहळ्यात आमदार किरण सामंत यांनी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्वांचे स्वागत करत त्यांना शिवसेनेचा भगवा दुपट्टा परिधान करून पक्षात प्रवेश दिला. यावेळी त्यांनी पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत जनतेच्या प्रश्नांवर प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले.
मार्गदर्शन करताना आमदार किरण सामंत म्हणाले, “शिवसेना ही सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटना आहे. विकास, पारदर्शक कारभार आणि जनसेवा या त्रिसूत्रीवर आमचा भर असून मतदारसंघातील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान व जबाबदारी दिली जाईल. सर्वांनी एकजुटीने काम करून गावागावात विकासाची गती अधिक वाढवूया.”
यावेळी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनीही आमदार किरण सामंत यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत मतदारसंघाच्या प्रगतीसाठी आणि शिवसेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
प्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी घोषणाबाजी करत नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
या पक्षप्रवेशामुळे राजापूर तालुक्यातील शीळ परिसरात शिवसेनेचे संघटन अधिक बळकट होण्यास मदत होणार असून आगामी काळात गावाच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम केले जाईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेना नेते रविंद्र नागरेकर, तालुका प्रमुख दिपक नागले, सभापती नंदिनी कदम, जि.प. सदस्य प्रकाश कुवळेकर, रमेश सुद, माजी सभापती सुभाष गुरव, ऍड. यशवंत कावतकर, प.स. सदस्य प्रसाद मोहरकर, उपतालुका प्रमुख राजन कुवळेकर, युवा सेना तालुका प्रमुख सुनिल गुरव, विभागप्रमुख जितेंद्र तुळसवडेकर, गावकर यशवंत बाईत, मंडळाचे प्रमुख दत्ताराम बाईत, गावकर रविंद्र बाईत, गावकर संतोष बाईत, शिवसेना युवा नेते योगेश नकाशे, अरविद लांजेकर, महेश नकाशे, सुरेश बाईत यांसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी वाडीतील सर्व ग्रामस्य महिलावर्ग पदाधिकारी उपस्थित होते.