देवगड: प्रतिनिधी
विकास कार्यकारी संस्थांचे सक्षमीकरण,संगणकीकरण व कामकाज पारदर्शक करणे ही काळाची गरज आहे.शेतकरी हा सहकाराचा केंद्रबिंदू आहे.केवळ पारंपारिक कर्जवितरण व शेती कर्ज वाटपावर अवलंबून न राहता विकास संस्थांनी नवीन व्यवसायांकडे वळले पाहिजे.सहकार चळवळ तळागाळापर्यंत मजबूत करणे हे जिल्हा बँकेचे प्रमुख उद्दीष्ट आहे.डीमार्टच्या धर्तीवर तालुक्याचा ठिकाणी व ग्रामीण भागात किमान 10 विकास संस्था मिळून सहकार बाजार उभारण्याची संकल्पना आखली जात आहे असे मत सिंधदूर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी येथे व्यक्त केले.
जिल्हा बँकेच्या वतीने देवगड तालुक्यातील गुणवंत विकास सहकारी संस्थाचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम बुधवारी इंद्रप्रस्थ हाॅल येथे आयाेजित करण्यात आला हाेता.यावेळी याचे उद्घाटन मनीष दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार अॅड.अजित गाेगटे, भाजपा जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, बँकेचे संचालक अॅड.प्रकाश बाेडस, गजानन गावडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई, मकरंद जाेशी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रमाेद गावडे तसेच बँकेचे अधिकारी उपस्थित हाेते.
जिल्ह्यात खाजगी ायनान्स कंपन्यांर्माफत 24 टक्कयाहून अधिक व्याजदरानं सुमारे 200 काेटीहून अधिक रकमेचे कर्जवाटप झाले आहे.या वसुलीच्या पाशातून आणि आर्थिक अडचणीतून सर्वसामान्य शेतकरी व नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यातील विकास संस्था अधिक सक्षमपणे कार्यरत हाेणे आवश्यक आहे.विकास संस्थाच्या प्रत्येक शेतकरी सभासदाचे केवाय्सी केले जाणार आहे.कर्जप्रक्रिया गतीमान करण्यासाठी सुगी नावाचे अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे.कर्जवसुली सुलभ व्हावी व शेतकèयांना मुदतीत कर्जपरत ेड हाेण्यासाठी डीजीटल पाठपुरावा यंत्रणा उभारली जात आहे.विकास संस्थांचा दृष्टीकाेन अधिक विस्तृत व दुरगामी व्हावा यासाठी जिल्ह्यातील सर्व विकास संस्थांचा प्रत्येकी एका प्रतिनिधीला बारामती येथे विशेष प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे.सहकारी संस्थांचा सचिवांना स्थैर्य मिळावे यासाठी जिल्हा बँकेने विशेष पुढाकार घेतला आहे.5 ते 7 हजार मानधन असणाèया 72 पात्र सचिवांचा केडर पध्दतीअंतर्गत किमान पगार 17,500 ते 25 हजार रूपयांपर्यंत वाढविण्यात आला आहे.सचिवांच्या पगारापाेटी हाेणारा वार्षिक 70 लाखांचा फरक जिल्हा बँक पुढील पाच वर्षे स्वत:चा नफफ्यातून भरणार आहे.तसेच सचिवांच्या सुरक्षिततेसाठी वैद्यकीय व आपत्कालीन विमा संरक्षण बँकेर्ते उपलब्ध करून देण्यात आले आहे.आंबा व काजु उत्पादक भागातील संस्थांनी कॅनिंग व काजू खरेदी-विक्री प्रकल्प उभारावेत.शासकीय जमीनींवर गाेदामे आणि इमारतींसाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरावरून असे आठ प्रस्ताव मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत.काजू बाेर्डाच्या माध्यमातून संस्थांना कंपाऊंड वाॅल, ड—ाईंग यार्ड, ग्रेडींग आणि माॅयश्चर तपासणी यंत्रणांनी सज्ज गाेदाम उभारण्यासाठी 50 टक्के अनुदान देण्याची याेजना आखली जात आहे.शेतकèयांचा विविध गरजा लक्षात घेता 5 लाख रूपयांपर्यंतचा थेट कर्जासाठी बळीराजा कृषी कर्जयाेजना लागू करण्यात आली आहे.तसेच मुलांचे शिक्षण किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी पात्रतेनुसार कंझम्पशन लाेन उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.खावटी कर्जांची वसुली न झाल्याने जिल्ह्यातील अनेक विकास संस्था अडचणीत आल्या आहेत परंतू यावर शासन व बँकस्तरावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे दळवी यांनी सांगीतले.विकास ंसंस्थांनी वर्षाला किमान दीड काेटी रूपयांची उलाढाल केलीच पाहिजे.ज्या बँकेला चार हजार काेटींचा टप्पा गाठायला 38 वर्षे लागली त्याच बँकेने पुढील पाच वर्षात साडेसात हजार काेटीपर्यंत मजल मारली आहे.येत्या डिसेंबरपर्यंत हा टप्पा आठ हजार काेटीपर्यंत नेण्याचे बँकेचे उद्दीष्ट आहे.या यशात जिल्ह्यातील शेतकरी व सभासदांचे माेठे याेगदान असल्याचे दळवी यांनी सांगीतले.जिल्ह्यात आदर्श सहकाराची चळवळ आपण पुढे नेवूया.अनेकांच्या याेगदानातून सहकार रूजला आहे.हा सहकार पुढील पिढीकडे अधिक सक्षमपणे दिला पाहिजे.नाेकरी व्यवसायाच्या अनुषंगाने जिल्ह्यातून माेठ्या प्रमाणात युवकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी हाेत आहे हे स्थलांतर थांबविण्याची जबाबदारी सहकारामधील कार्यकर्त्यांची आहे असे मत दळवी यांनी व्यक्त केले.
अजित गाेगटे म्हणाले, 100 टक्के कर्जवसुली करणाèया विकास संस्थांचा सत्कार हा एक चांगला उपक्रम जिल्हा बँकेने सुरू केला आहे हाच उपक्रम पुढे सुरू ठेवावा.काळाच्या बराेबर बदलण्याची ताकद जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यामध्ये आहे असे गाैरवाेद्गार यावेळी गाेगटे यांनी काढले.संस्थेची उन्नती हाेईल यादृष्टीने प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.बँकेचे संचालक गजानन गावडे म्हणाले, विकास संस्था संचालकाभिमुख व सभासदाभिमुख करण्यासाठी काम करावे.सहकार जगणे आणि संस्था सक्षम करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.अॅड.प्रकाश बाेडस म्हणाले, 100 टक्के कर्जवसुलपात्र संस्थांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे.पुर्ण संस्था संगणकीकृत झाल्या आहेत.खावटी कर्जामुळे काही संस्था अडचणीत आहेत.कर्ज माफ हाेणार या आशेवर कर्जभरणा हाेत नसून यामुळे संस्था अडचणीत आल्या आहेत यातून कायमस्वरूपी मार्ग काढणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.प्रास्ताविक जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरूध्द देसाई यांनी केले तर सुत्रसंचालन बँक अधिकारी संजय परब यांनी केले.यावेळी 100 टक्के कर्जवसुली करणाèया नाडण, किंजवडे, कुणकेश्वर, माेंड, मुणगे, पुरळ, पडेल, वाडा, वेळगिवे, पाेंभुले, शिरगाव, हडपीड,महाळूंगे व ताेरसाेळे या संस्थांचा सत्कार करण्यात आला.












