लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पूर्व भागातील क वर्ग पर्यटन स्थळ असलेले प्रभानवल्ली येथील बल्लाळ गणेश देवस्थानला आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नाने ग्रामीण यात्रा स्थळ विकास योजनेअंतर्गत हायमास्ट लाइट्स बसवण्यात आले.
बल्लाळ गणेश या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांच्या सुविधेसाठी हायमास्ट लाईट बसवणे गरजेचे होते. ही बाब लक्षात घेऊन पंचायत समिती सदस्य दादा पत्की यांनी या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला. सुविधा उपलब्ध झाली असून याबद्दल आमदार किरण सामंत व दादा पत्की यांचे बल्लाळ गणेश देवस्थान व्यवस्थापन समितीने आभार मानले आहेत.
दरम्यान, मंदिर परिसराचे सुशोभीकरण करणे, मुलांसाठी गार्डन व भक्तांसाठी भक्तनिवास. आणि कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक हॉल उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आमदार किरण सामंत यांच्याशी पत्राव्यवहार केला असून सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे त्याचे प्रस्ताव ही पर्यटन विभागाला गेले आहेत. खोरनिनको धरण, माचाळ, बल्लाळ गणेश देवस्थान, प्रभानवल्ली, विशाळगड हे पर्यटनासाठी एकमेकांना जोडले गेले तर रोजगार उपलब्ध होऊ शकतात. असे माजी जिल्हा परिषद सदस्य व बल्लाळ गणेश देवस्थानचे अध्यक्ष अमोल रेडीज यांनी सांगितले.













