विद्यार्थ्यांनी अनुभवले ग्रामीण कलाकारांच्या व्यवसायाभिमुख कलाविष्काराचे अनोखे जीवनदर्शन

जिल्हा परिषद शाळा असगोली नं. २ शाळेची क्षेत्रभेट संपन्न

गुहागर प्रतिनिधी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असगोली नंबर दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापिका प्रियंका शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली व केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील व शिक्षण तज्ञ सदस्य संतोष घुमे यांचे उपस्थितीत क्षेत्रभेट अंतर्गत चित्रकार श्री प्रणय घुमे यांच्या गणपती कारखाना येथे भेट देण्यात आली.
त्यावेळी शाळेचे व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य संतोष घुमे ,मुख्याध्यापिका प्रियांका शिंदे मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सदर क्षेत्र भेटी अंतर्गत गणपती निर्मितीसाठी विविध मातीची निवड, विविध प्रकारचे साचे व त्याची निर्मिती, विविध साच्यातून व मुक्तहस्त कौशल्यातून होणारी गणेश निर्मिती, कलात्मकतेने विविध रेखीव मूर्तीना आकर्षक पणे रंगविणे ,विविध प्रकारच्या आकर्षक चित्रांबरोबर गणेश मूर्तींची केलेली निर्मिती, मूर्तीतील रंगसंगती व हुबेहूब पणा येण्यासाठी दागिने ,डोळ्यांची ठेवण ,भुवया इत्यादी कला कौशल्याची कामे याबाबत, विविध कलादालनातून सविस्तर माहिती विद्यार्थ्यांनी मुलाखती द्वारे प्राप्त करून घेतली. त्यावेळी बोलताना गणेश मूर्तिकार ग्रामीण कलावंत प्रणय घुमे म्हणाले की पूर्वी आम्ही २५ मूर्ती पासून सुरुवात केलेली ही चित्र शाळा आता २५०ते 300 मूर्तींची निर्मिती केली जात आहे ग्राहकांची विश्वासार्हता संपादन केली गेली आहे. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख डॉ मनोज पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तुंग झेप घ्यावी हाच खरा आरटीई एक२००९ चा गाभा आहे,भारत हा खेड्यांचा देश आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ग्रामीण कलाकारांच्या लोकजीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटी अंतर्गत परिसर अभ्यास अंतर्गत प्रत्यक्ष ज्ञान संपादन केले .मुख्याध्यापिका प्रियांका शिंदे मॅडम यांनी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन प्रत्यक्ष सहल पद्धतीद्वारे, क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित शिक्षण दिले. या क्षेत्रभेटी द्वारे विद्यार्थ्यांना नवनिर्मितीचा अनोखा आनंद मिळाला तसेच विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली.