रत्नागिरी : फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे (फामपेडा) अध्यक्ष उदय लोध यांची अखिल भारतीय संघटनेच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे. कन्सोर्शियम ऑफ इंडियन पेट्रोल डिलर्स असोसिएशन (सीआयपीडीए) ही देशातील पेट्रोल पंपचालकांची देशव्यापी संघटना आहे. या संघटनेच्या विद्यमान अध्यक्षांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. त्यामुळे दोन यांची या पदावर तातडीने नियुक्ती करण्यात आली असून संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल. ही निवड दोन वर्षांसाठी आहे.
सुमारे चार चार दशकाहून जास्त काळ या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या १९९४-९५ मध्ये पेट्रोल पंप चालकांच्या जिल्हा पातळीवर संघटनेचे पदाधिकारी झाले. त्यानंतर १९९९-२००० या काळात राज्य संघटनेच्या सचिवपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. सुमारे आठ वर्षांपूर्वी, २०१४ साली ते ‘फामपेडा’चे अध्यक्ष झाले. त्याचबरोबर कन्सोर्शियम ऑफ इंडियन पेट्रोल डीलर्स असोसिएशन या पेट्रोल पंपचालकांच्या देशव्यापी संघटनेच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली अशा प्रकारे गेली सुमारे बावीस वर्षे ते पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.
निरनिराळ्या आर्थिक समस्यांना तोंड देत असलेल्या पेट्रोल पंप चालकांना संघटनेच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याच्या कामाला आपण प्राधान्य देणार असल्याचे नमूद करून लोध म्हणाले की, देशातील पेट्रोल पंपचालक सध्या मोठ्या अडचणीच्या काळातून जात आहेत. बाहेरून पाहणाऱ्या व्यक्तीला हा व्यवसाय मोठा नफ्याचा वाटत असला तरी प्रत्यक्षात तेल कंपन्यांच्या अटी आणि कायद्याच्या कचाट्यात सापडल्यामुळे चालक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. त्यांना संघटित करून या प्रश्नांवर उपाय शोधण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. हे करताना अपूर्व चंद्र समितीच्या केलेल्या शिफारशींची सरकारने अंमलबजावणी करावी, ही आमची प्रमुख मागणी असून गेली पाच वर्षे त्यावर काहीही हालचाल झालेली नाही पेट्रोल पंप चालकांचे पेट्रोलचे दर सतत वाढत आहेत पण पेट्रोल पंप चालकांचे कमिशन गेल्या पाच वर्षात वाढलेले नाही. या कमिशन बाबत तर सहा महिन्यांनी आढावा घेण्यात यावा आणि परिस्थितीनुसार त्यामध्ये वाढ करावी अशी मागणी आहे अपूर्व चंद्रा चंद्रास समितीने त्याबाबत अतिशय व्यवहारी सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करावी इतकीच आमची मागणी आहे पण तेही झालेलं नाही त्यामुळे पंपचालकांना पदरमोड करून हा व्यवसाय चालवावा लागेल कोणत्याही शासकीय कोणताही शास्त्रीय किंवा अभ्यासपूर्ण दृष्टिकोन न ठेवता पेट्रोल पंपाची बेसुमार वाढ देशातील सार्वजनिक क्षेत्रात असलेल्या पेट्रोल कंपन्यांनी अंतर्गत स्पर्धेतून केलेली पेट्रोल पंपांची बेसुमार वाढ ही एक मोठी डोकेदुखी झाली आहे. सर्वच पंपचालकांचे अर्थशास्त्र त्यामुळे धोक्यात आहे.
पेट्रोल पंपांना पुरवठा करणाऱ्या देशातील तेल कंपन्यांशी सतत संघर्षाची आमची इच्छा नाही. पण कंपन्यांच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर एकत्र बसून प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आम्ही तशी भूमिका वेळोवेळी घेतली. पण तेल कंपन्यांकडून अपेक्षित सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या पाच वर्षांत अशा स्वरूपाची संयुक्त बैठकसुध्दा झालेली नाही. त्यामुळे देशातील पंपचालक आणि कंपन्यांमधील व्यवहाराबाबतचे महत्त्वाचे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत, याकडेही लोध यांनी लक्ष वेधले आणि आपण याबाबत सकारात्मक भूमिका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन केले.