खेड : खेड शहरातील गुलमोहर पार्क येथील एकास मिळकत निर्वेध असल्याचे भासवत २९ लाख रुपयांस विकून विश्वासघात करत ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांच्या फसवणूकप्रकरणी तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका महिलेसह म. हनिफ हमजा मुल्ला (रा. निळीक), जावेद युसूफ परकार (रा. गुलमोहर पार्क) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. १० जुलै २०१७ ते १३ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत तिघांनी मिळकत क्रमांक २७७/१/अ/९ मधील क्षेत्र ०-०४-६० या मिळकतीच्या कागदपत्रांवर येथील बँक ऑफ महाराष्ट्रमधून कर्ज काढून गहाण ठेवलेली असतानाही मिळकत निर्वेध असल्याचे भासवून फिर्यादीस २९ लाख रूपयांना विकून विश्वासघात केला व ३० लाख ८४ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.









