खास. नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर

वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालय येथे १० ऑगस्टला भाजप तर्फे आयोजन

वेंगुर्ले : प्रतिनिधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून वेंगुर्ला भाजप तर्फे तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी भव्य मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

हे शिबिर सोमवार, १० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत उपजिल्हा रुग्णालय, वेंगुर्ला येथे पार पडणार आहे. या शिबिरात एस एस पी एम मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे (सिंधुदुर्ग) येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व सल्ला दिला जाणार आहे.

यामध्ये सामान्य औषधशास्त्र व आजार, स्त्रीरोग विभाग यात महिलांचे आजार व प्रसूती, दंतचिकित्सा व दंतरोग, सामान्य शल्यक्रिया सल्ला, नेत्रचिकित्सा व डोळ्यांची तपासणी तसेच कान, नाक व घसा, बालरोग, अस्थिरोग व सांधेदुखी याबाबत तज्ञ डॉक्टरांकडून उपचार व सल्ला दिला जाणार आहे.

शिबिराच्या दिवशी नागरिकांनी आपले जुने वैद्यकीय रिपोर्ट, केसपेपर व आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल नंबर आणणे आवश्यक आहे, प्राथमिक तपासण्या मोफत दिल्या जातील. या शिबिराचा सर्व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी वसंत तांडेल ९४२२४३६६३६ व अनिल कुपडकर : ९४२०९०७६६१ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.