रत्नागिरी :
कोकणाच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या रेवस–रेड्डी सागरी महामार्गाच्या उभारणीला आता वेग आला आहे. १४८ कोटी रुपये खर्चाच्या केळशी खाडी पुलाचे बांधकाम युद्धपातळीवर सुरू असून, कोकणवासीयांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला आशेचा किरण दिसू लागला आहे. मात्र, दाभोळ आणि जयगड खाडीवरील पुलांच्या कामांना अद्याप प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने संपूर्ण सागरी महामार्गाचे स्वप्न साकार होण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. केळशी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर कोकणातील वाहतूक, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Home महत्वाच्या बातम्या कोकणाच्या विकासाला वेग! १४८ कोटींच्या केळशी खाडी पुलाचे काम युद्धपातळीवर; दाभोळ-जयगड पुलांची...











