भाजपा व चेंदवण ग्रामपंचायतीचा उपक्रम;
सरपंच वैभव चेंदवणकर यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांकडून कौतुक
स्वप्निल कदम l कुडाळ: भाजपा चेंदवण व चेंदवण ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवास सवलतीसाठी आवश्यक असलेल्या NCMC कार्ड नोंदणीचे जिल्ह्यातील पहिले मोफत शिबिर ५ व ६ ऑगस्ट रोजी चेंदवण ग्रामपंचायत कार्यालयात उत्साहात पार पडले. या दोन दिवसीय शिबिरात तब्बल २६२ नागरिकांनी नोंदणी करून लाभ घेतला.
शिबिराचे उद्घाटन ५ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, कुडाळ मंडल अध्यक्ष संजय वेर्गुळेकर व चेंदवणचे सरपंच वैभव चेंदवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. महिला व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता शिबिराचा कालावधी एक दिवसाने वाढवून दोन दिवस करण्यात आला.
शिबिराला नेरूर जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर तसेच कुडाळ मंडल युवा मोर्चा अध्यक्ष तन्मय वालावलकर यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी बूथ अध्यक्ष अण्णा भरडकर, बाळू कोचरेकर, ग्रामपंचायत सदस्य गौतम चेंदवणकर, ऋषिकेश माधव, उमेश नाईक, सौ. प्रणाली तेंडोलकर, सौ. विजयश्री मेस्त्री, सौ. सुचिता पोयरेकर, कु. सायली नाईक, माजी सरपंच सौ. उत्तरा धुरी, प्रशांत तेंडोलकर, हेमंत जुवेकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रसाद रांगणेकर, अविनाश शृंगारे, सौ. स्वाती परब, सौ. मनिषा धुमाळ तसेच भाजपा चेंदवणचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. ऑपरेटर विठ्ठल धुरी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष भुपेश चेंदवणकर आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य नारायण शृंगारे यांनीही विशेष सहकार्य केले.
सरपंच वैभव चेंदवणकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या मोफत NCMC कार्ड नोंदणी शिबिराचे चेंदवणमधील ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग आणि ग्रामस्थांकडून विशेष कौतुक होत असून, सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या प्रवास सवलतीचा लाभ सहज उपलब्ध करून देणारा हा उपक्रम ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.











