माणगाव हायस्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सचिन धुरी

उपाध्यक्षपदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड; विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार

स्वप्निल कदम-कुडाळ :

श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगावच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सचिन धुरी, तर उपाध्यक्षपदी दत्ता कोरगावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. यावेळी समितीच्या विविध सदस्यांचीही निवड करण्यात आली.

 

समिती सदस्य म्हणून आर्या घाडी, मनोहर धुरी, पराग पाडगावकर, शर्वाणी मेस्त्री, ईश्वरी सावंत, सुनील जाधव, प्रज्ञा घाडी, प्रणिता पारधी, नागेश सावंत, वंदना आरेकर, रेश्मा परब, समीक्षा साटम, विनयकुमार आडेलकर, नम्रता टिळवे, वर्षा भिसे, राजेश चाळके, विनया साटम व अनुष्का तेली यांची निवड झाली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून प्रशांत आडेलकर, भरत केसरकर व रोहन मेस्त्री, संस्था संचालक प्रतिनिधी म्हणून चंद्रशेखर जोशी व मेघश्याम पावसकर यांची निवड करण्यात आली. मुख्याध्यापक तथा सचिव म्हणून चंद्रकांत चव्हाण यांची निवड झाली.

 

माणगाव हायस्कूलच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात सुमारे ७५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती, सर्वांगीण विकास तसेच प्रशालेच्या विकासासाठी सर्वोतोपरी यशस्वी प्रयत्न करण्याचा निर्धार नवनियुक्त अध्यक्ष सचिन धुरी व उपाध्यक्ष दत्ता कोरगावकर यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला.

 

यावेळी उपस्थित पालक, संस्था पदाधिकारी तसेच प्रशालेच्या वतीने नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष व समिती सदस्यांचे अभिनंदन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा सचिव चंद्रकांत चव्हाण यांनी केले, तर आभार चंद्रशेखर जोशी यांनी मानले.