ग्रामपंचायत कारिवडे व विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिराचे आयोजन
सावंतवाडी:प्रतिनिधी
कारिवडे गावातील एसटी प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने एस. टी. चे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन सी एम सी) काढण्यासाठी कारिवडे ग्रामपंचायत येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ग्रामपंचायत कारिवडे व विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने एनसीएमसी कार्ड या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. एनसीएमसी कार्ड ची गावातच सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने एसटीच्या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले
यावेळी कारिवडे गावचे सरपंच सौ.आरती अशोक माळकर, विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटना अध्यक्ष मंगेश तळवणेकर, भाजप आंबोली मंडळ उपाध्यक्ष अशोक माळकर, मनोहर गुरव, मानकरी शांताराम गांवकर, ग्रामपंचायत सदस्या सौ. प्रतिभा जाधव, ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे, देवेन डिजिटल सेटर चे कर्मचारी रश्मी रामकृष्ण देवुसकर, देवेन जाधव, सचिन गोसावी, रामचंद्र पालव, कर्मचारी तसेच सर्व ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.













