सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग चे सचिव भरत चव्हाण यांची राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष पदी निवड

सिंधुदुर्ग विभागातर्फे अध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते सत्कार…

वेंगुर्ले : दाजी नाईक
सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग चे विभागीय सचिव श्री. भरत चव्हाण यांची राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. याबद्दल सिंधुदुर्ग विभागातर्फे त्यांचा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, तसेच सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघ विभागीय अध्यक्ष श्री संदेश सावंत यांच्या हस्ते श्री.चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.
वेताळ बांबर्डे, तेली भवन येथे संपन्न झालेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमाला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई, भाजपा कामगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री अशोक राणे, सेवा शक्ती संघर्ष विभागीय उपाध्यक्ष श्री निलेश तेंडुलकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा कुडाळ आगार अध्यक्ष श्री जयेश चिंचळकर, वेंगुर्ला नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, राज्य कार्यकारणी कोशाध्यक्ष श्री, रामभाऊ मुंडे, सेवा शक्ती संघर्ष पुणे प्रदेशाध्यक्ष श्री तांबेकर, जिल्हा परिषद माजी सदस्य भारती चव्हाण, भाजपा सदस्य श्री शैलेश जामदार आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी श्री संदेश सावंत यांनी बोलताना आम्ही सर्व एस टी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी असून, कर्मचाऱ्यांनी जनतेला चांगली सेवा द्यावी असे आवाहन केले, सर्व मान्यवरांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून भरत चव्हाण यांना पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या,
अखेर श्री भरत चव्हाण यांनी सर्व मान्यवरचे आभार मानून आज मी संघटनेच्या राज्य कार्यकारणी उपाध्यक्ष होण्यामागे सर्व भाजपा पदाधिकारी तसे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले कर्मचारी या मुळे इथपर्यंत पोहोचलो, सर्वांचे मनापासून आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.