आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत नूतन कार्यालय व महिला भवनाचे उद्या उद्घाटन

दोडामार्ग : प्रतिनिधी

आयनोडे हेवाळे येथील नूतन ग्रामपंचायत कार्यालय व तालुक्यातील पहिल्या महिला भवनाचे उद्घाटन मंगळवार २४ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी शालेय शिक्षणमंत्री आ. दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर दळवी, महेश सारंग, भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुहास पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

सकाळी १०.३० वाजता नूतन वास्तूंचे उद्घाटन व मान्यवरांचे मार्गदर्शन होईल. दुपारी १२ ते सायंकाळी ४ दरम्यान आरोग्य शिबिर व महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम होईल.

सर्व नागरिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच सौ. साक्षी देसाई, उपसरपंच सौ. वैशाली गवस, सर्व ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, ग्रामविकास अधिकारी एस. बी. पाटील यांनी केले आहे.