चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविकेंकडून सावंतवाडी पालिकेला सदिच्छा भेट

पर्यटन स्थळे व विकास प्रकल्पांची घेतली माहिती

​सावंतवाडी :
चिपळूण नगरपरिषदेच्या नगरसेविका रसिका देवळेकर यांच्यासह अन्य नगरसेविकांनी सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट देऊन शहरातील पर्यटन आणि विविध विकासकामांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी सावंतवाडी शहरातील प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देत संपूर्ण शहराची पाहणी केली आणि येथील पर्यटन व्यवस्थेची माहिती घेतली.
​या प्रसंगी सावंतवाडी नगरपालिकेचे सभापती आनंद नेवगी, पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सभापती दिपाली भालेकर आणि सभापती प्रतीक बांदेकर यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच सावंतवाडी शहरात राबवले जात असलेले विविध विकास प्रकल्प, नागरी सुविधा आणि भावी योजनांची सविस्तर माहिती त्यांनी चिपळूणच्या नगरसेविका यांना दिली. या अभ्यासपूर्ण भेटीमुळे दोन्ही नगरपालिकांमधील पर्यटन विकास आणि नागरी सुविधांच्या आदान-प्रदानास मदत होणार आहे.