जामसंडे वळकुवाडीत आंब्याचे झाड घरावर कोसळून नुकसान

देवगड : जामसंडे वळकुवाडी येथे जोरदार वाऱ्यामुळे आंब्याचे मोठे झाड धुरी व भडसाळे यांच्या घरावर कोसळून नुकसान झाले. या घटनेत घराच्या छपरासह इतर साहित्याचे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा सभापती तन्वी चांदोस्कर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भाजप महिला उपाध्यक्षा मृणाली भडसाळे, महेश भडसाळे, नगरपंचायत कर्मचारी प्रदीप लाड, कुंदन घाडी, प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण लोंढे, सचिन घाडी, सचिन राऊत, निलेश कणेरकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, बाधित कुटुंबाला तातडीची मदत म्हणून मृणाली भडसाळे यांनी ताडपत्री उपलब्ध करून दिली. स्थानिक नागरिकांनी नुकसानग्रस्तांना शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.