मसुरे | प्रतिनिधी
मसुरे देऊळवाडा येथील मूळ रहिवासी अशोक दशरथ मेस्त्री (42 वर्ष ) यांचे मुंबई जोगेश्वरी येथे निधन झाले. जोगेश्वरी येथे सुतारकाम व्यावसायिक म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, एक बहिण, चुलते असा परिवार आहे. मसुरे देऊळवाडा येथील शामसुंदर मेस्त्री यांचे ते पुतणे होत.











