मळगाव येथील रहिवासी दिगंबर नाईक यांचे मुंबईत निधन 

 

सावंतवाडी : मळगाव येथील मूळ रहिवासी आणि सध्या चंदनसार, विरार (पूर्व) येथे वास्तव्यास असलेले दिगंबर महादेव नाईक (वय ५३) यांचे मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने नाईक कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दिगंबर नाईक हे अत्यंत मनमिळाऊ, नम्र आणि आपुलकीच्या स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, काका, काकी, चुलत भाऊ, बहीणी तसेच वहिनी, पुतणे, पुतण्या असा मोठा परिवार आहे.