ओटवणे (प्रतिनिधी ) विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण व्हावी, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि साहित्याची गोडी वाढावी, या उद्देशाने नवीन राष्ट्रीय धोरणानुसार मराठी भाषा विकास कौशल्य मंडळ आणि प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रम प्रसंगी श्री.भरत गावडे (नवीन राष्र्टीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य)मा.श्री.म.ल.देसाई(विश्वकोश निर्मिती मंडळ सदस्य) मा.श्री.विठ्ठल कदम (कवि आणि महाराष्र्ट राज्य साहित्य संस्कृती मंडळ सदस्य) मा.श्री.प्रमोद पावसकर (माजी विस्तार अधिकारी) असे तज्ञ मार्गदर्शक उपस्थित होते.कवी श्री.कदम यांनी कथा कशी लिहावी, कवितेची निर्मिती कशी करावी, लेखन करताना कोणत्या बाबींची काळजी घ्यावी तसेच वाचन आणि लेखनाचा परस्पर संबंध याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. नियमित वाचन, निरीक्षण, चिंतन आणि सातत्यपूर्ण लेखन यामुळे लेखनकौशल्य विकसित होते याची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली.त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्फूर्त अशा कविता,कथांचे सादरीकरण केले.
मा.श्री.भरत गावडे सरांनी मराठी विषयातील उपयोजित लेखना विषयी सखोल मार्गदर्शन केले.श्री.म.ल.देसाई सरांनीही मातृभाषा आणि बोलीभाषा यांच जिवनातील महत्व विषद केले. या कार्यशाळेत जि.प.प्रार्थमिक शाळा असनियेचे विद्यार्थीही उपस्थित होते. तीनतास चाललेल्या या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्फूर्त असा प्रतिसाद लाभल्यामुळे मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांचे पुस्तके बक्षीस देऊन कौतूक केले.विशेष म्हणजे कवी. मा.श्री विठ्ठल कदम यांनी आपला आगामी ‘फाळ’ हा काव्यसंग्रह प्रकाशना पुर्वीच विद्यार्थ्यांना भेट स्वरूपात दिला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेचे शिक्षक श्री.देसाई तर आभार शालेय मुख्यमंत्री वेदांगी कोळापटे हीने मानले.










