शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार
शिरगाव (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी येथे मंगळवारी शाळा व्यवस्थापन समितीची सभा पार पडली. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ. अस्वी अमित पुजारे, तर उपाध्यक्षपदी सौ. ऋतुजा राजेश सुर्वे यांची निवड करण्यात आली.
सभेच्या प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीची रचना, मार्गदर्शक सूचना व संबंधित परिपत्रकाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात आली.
या नूतन समितीमध्ये रश्मी रामदास परब, प्रदीप संभाजी परब, सानिका शंकर परब, प्राची प्रताप परब, गणेश रमेश चव्हाण, संतोष चंद्रकांत परब, दीपक अनंत परब, मानसी मोतीराम सुर्वे, स्वरा कुलदीप धुमक, सचिन मनोहर ठाकूर, अमर आनंद नायडू, स्नेहा सयाजी परब, प्रियांका नामदेव परब आणि महेश केशवराव इंगोले यांचा समावेश आहे. समितीचे सचिव म्हणून मुख्याध्यापक श्री. गोविंदराव राजाराम जाधव काम पाहणार आहेत.
नूतन समितीच्या माध्यमातून शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे, शाळेच्या भौतिक सुविधांचा विकास करणे तसेच पालक, शिक्षक आणि समाज यांच्यातील समन्वय अधिक दृढ करण्यासाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार करण्यात आला.
नूतन समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.










