लांजा (प्रतिनिधी) :पी. एम. श्री. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नंबर १ च्या दोन विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यश संपादन केले असून त्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.
गुणवत्ता यादीत स्थान पटकाऊन शाळेच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या विद्यार्थी यामध्ये अस्मि विशाल लिंगायत हिने तालुक्यात २ री आणि जिल्ह्यात १३ वा क्रमांक पटकावला. तर वेदिका पिरगोंडा माळी ही तालुक्यात १३ वी आणि जिल्ह्यात ११३ वी आली.
या सर्व यशस्वी विद्यार्थिनींना सौ. समीक्षा सावंत आणि सौ. सुचेता कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा कुलकर्णी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश लांजेकर, उपाध्यक्ष सौ. अर्चना लांजेकर, लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, तसेच सर्व समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या आहेत.













