वेंगुर्ले : प्रतिनिधी
हर घर तिरंगा अभियान अंतर्गत श्री देवी सातरी हायस्कूल व कै. सौ. गुलाबताई दिनानाथ नाईक कनिष्ठ महाविद्यालय वेतोरे येथे आज गुरुवारी जिल्हा परिषद चे शिक्षण व आरोग्य सभापती श्री. प्रितेश राऊळ यांच्या उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र खेबुडकर यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर गावात तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला पंचायत समिती सभापती श्री. शंकर घारे, जिल्हा परिषद सदस्य श्री. विजय नाईक, पंचायत समिती सदस्य श्री. नितीन मांजरेकर, गटविकास अधिकारी श्री. वासुदेव नाईक, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. दिनेश पाटकर, पालकरवाडी सरपंच श्री सदाशिव पाटील, आडेली सरपंच सौ. यशस्वी कोंडसकर, वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी श्री. संतोष गोसावी, मुख्याध्यापक श्री. कै. डी. खरबडे सर आदी मान्यवर उपस्थित होते.












