सिंधुरत्न समृद्ध योजना 2.O चा अभ्यासपूर्वक विचार करून गुहागर तालुकावासियांनी लाभ घ्यावा

डॉ. विनय नातू यांचे गुहागर तालुका बैठकीत पदाधिकाऱ्यांना आवाहन

गुहागर प्रतिनिधी:
सिंधुरत्न समृद्ध योजना 2 . O अंतर्गत रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष व माजी आमदार डॉ. विनयजी नातू यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा सुरू असून गुहागर तालुक्यातील बैठकीत त्यांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही योजना पोहचवून लाभ घेण्याचे आवाहन केले.
गुहागर शहरातील ज्ञानरश्मी वाचनालयाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी गुहागर तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते बैठक आयोजित करण्यात आली होती. सिंधुरत्न समृद्ध योजना २. ० रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ विनय नातू यांचा गुहागर तालुक्याच्या वतीने तालुकाध्यक्ष अभय भाटकर यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर डॉ नातू यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याजवळ संवाद साधताना सिंधुरत्न समृद्ध योजना, त्याचे शासकीय निर्णय, योजनेच्या अटी शर्ती, प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक असणा-या बाबी याची सविस्तर माहिती देऊन पर्यटन, मत्स्य व्यवसाय, इतर विभाग, जिल्हा नियोजन मधून कोणत्या कारणासाठी निधी मिळू शकतो याची माहिती घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन परिपूर्ण प्रस्ताव सादर करून लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले तसेच संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून अभिनव लोकोपयोगी उपक्रम राबवून भारतीय जनता पार्टी संघटनात्मक अधिक मजबूत करावी असे सांगितले.
या बैठकीला भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, जिल्हा सरचिटणीस, उपसभापती निलेश सुर्वे, वसंत ताम्हणकर, तालुकाध्यक्ष अभय भाटकर, नगराध्यक्ष निता मालप, जिल्हा परिषद सदस्य अपूर्वा बारगोडे, पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी, माजी सभापती सुरेश सावंत, दिप्ती असगोलकर, माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण शिगवण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रथमेश पाडेकर, श्री दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष किरण खरे, श्री व्याडेश्वर देवस्थान अध्यक्ष शार्दुल भावे, शहराध्यक्ष नरेश पवार, माजी पंचायत समिती सदस्य विजय भुवड, उपाध्यक्ष आशिष विचारे, विनायक सुर्वे, संदिप कोंडविलकर, सरचिटणीस सचिन ओक,कोषाध्यक्ष साईनाथ कळझुणकर, सर्व नगरसेवक आदींसह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.