रत्नागिरी :
Ratnagiri District Yogasana Sports Association द्वारे आयोजित ‘जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २०२६-२७’ दिनांक १६ ऑगस्ट २०२६ रोजी खेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून आलेल्या तब्बल १२० खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअल, आर्टिस्टिक सिंगल, आर्टिस्टिक पेअर आणि रिदमिक् पेअर अशा एकूण ४ विविध प्रकारांमध्ये सामने पार पडले. या सर्व प्रकारांमध्ये ‘शिव योगा क्लासेस’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत सुवर्णमय कामगिरी केली आणि स्पर्धेत शिव योगा क्लासेसचा दबदबा निर्माण केला.
या स्पर्धेत शिव योगा क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी विविध गटांमध्ये नेत्रदीपक विजय मिळवला. सब ज्युनिअर मुलींच्या गटात राधिका मंदार पेडणेकर हिने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअल आणि आर्टिस्टिक सिंगल या दोन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला, तर दुर्वा अमोल साळवी हिने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअलमध्ये तृतीय क्रमांक आणि तृष्णा कमलेश शिर्धंकर हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. ज्युनिअर मुलींच्या गटात सौम्या देवदत्त मुकादम हिने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअलमध्ये तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सिनिअर B महिला गटात श्रीजा सिद्धेश सलपे हिने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअल प्रकारात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले.
मुलांच्या गटातही शिव योगा क्लासेसच्या खेळाडूंनी आघाडी कायम ठेवली. ज्युनिअर मुलांच्या गटात प्रतिक पुरंदर पूजारी याने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअल आणि आर्टिस्टिक सिंगल या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. याच गटात रत्नेश हितेश आडिवरेकर याने आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम, आर्टिस्टिक सिंगलमध्ये द्वितीय आणि ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअलमध्ये तृतीय क्रमांक मिळवला. त्याच्यासोबत आर्टिस्टिक पेअरमध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या आर्य दिनेश हरचकर याने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअलमध्येही द्वितीय क्रमांक संपादन केला. सब ज्युनिअर मुलांच्या गटात समर्थ विनय कोरगावकर याने आर्टिस्टिक सिंगल प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच सिनिअर गटात वरद मोहन बल्लाळ याने ट्रेडिशनल इंडिव्हिज्युअलमध्ये द्वितीय क्रमांक तर श्रावणी शेलार हिने चतुर्थ क्रमांक मिळवला. या सर्व विद्यार्थ्यांना लाभलेले मार्गदर्शक श्री. किरण संगरे( योगा शिक्षक व रा.भा शिर्के प्रशाला गुरुकुल, रत्नागिरी चे प्रमुख) व श्री. दुर्वांकूर अविनाश चाळके ( राष्ट्रीय योगा प्रशिक्षक व शिव योगा क्लासेसचे संस्थापक )
शिव योगा क्लासेसच्या या सर्व गुणवंत स्पर्धकांनी आपल्या मेहनती च्या जोरावर यश मिळवले असून, त्यातील तब्बल १० विद्यार्थ्यांची आगामी राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नियमित सराव, शिस्त आणि मार्गदर्शकांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे भरभरून यश शक्य झाले आहे. सर्व यशस्वी खेळाडूंचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शकांचे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून कौतुक होत असून, राज्यस्तरीय स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.













