माखजन परिसरात गणेशोत्सवाचे वेध मूर्तीशाळांमध्ये लगबग

गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन परिसरात गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत.अगदी २४ दिवसावर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने,परिसरातील मूर्ती शाळांमध्ये लगबग पाहायला मिळत आहेत.
दरवर्षी नव्याने मूर्ती निवडणाऱ्या ग्राहकांची मूर्ती पसंती साठी व ऑर्डर पक्की करण्यासाठी मूर्ती शाळांमध्ये येजा वाढलेली पाहायला मिळत आहे.संगमेश्वर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात नागरिक दिवा,मुंबई.स्थित आहेत.विशेषतः ह्या भागात गणेशोत्वासाठी भक्तगण,मोठ्या संख्येने आपल्या स्वतः च्या गावाला येतात.प्रत्येकाची आवडती व मागणी नुसार मूर्ती वेळेत तयार करणे ही मूर्ती कारखाना मालकांची जबाबदारी असते.त्यामुळे सध्या मूर्ती शाळेत, मूर्ती बनवण्याची व रंगकाम करण्याची लगबग पाहायला मिळत आहे.
मध्यंतरी पेण हून प्लास्ट ऑफ पॅरिस च्या मूर्ती आणण्याचे प्रमाण अधिक होते.परंतु पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे शासनाचे आवाहन,व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाबद्दल जनजागृती यामुळे शाडू च्या मूर्तीची मागणी हळू हळू वाढू लागली आहे.
आरवली सह ,माखजन पंचक्रोशीत अनेक छोटे मोठे गणपती मूर्ती बनवण्याचे कारखाने आहेत.प्रत्येकाचे वैशिष्ट्य निश्चितच वेगवेगळे आहे.सरंद च्या संतोष महाडिक यांच्या कारखान्यात सुबक मूर्ती आणि आकर्षक रंग रागोटी यामुळे अनेक गावा परगावातून भाविक मूर्ती नेण्यासाठी येतात.श्री संतोष महाडिक यांच्या पत्नी सौ पूजा व मुलगी प्रगती ह्या देखील मूर्ती कामात मोठी मदत करतात.महाडिक कुटुंबीय देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देताना दिसत आहे.
विविध कारखान्यात रंग रांगोटी केलेले गणपती दिसत असल्याने,माखजन परिसरात वातावरण निर्मिती झाली आहे.