भाजयुमो मध्य रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी साहिल साळवी यांची निवड

रत्नागिरी:
भारतीय जनता युवा मोर्चाच्या (भाजयुमो) मध्य रत्नागिरी तालुका अध्यक्षपदी साहिल साळवी यांची निवड करण्यात आली आहे. विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते साहिल साळवी यांना निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले.
साहिल साळवी यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने सक्रिय राहून तरुण वर्गात मजबूत संघटन उभारले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पक्षाने ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली आहे.