आगवे जोशीवाडीतून २५ वर्षीय तरुण बेपत्ता, लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील आगवे जोशीवाडी येथून २५ वर्षीय तरुण २७ जुलै पासून बेपत्ता झाला असून याप्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज प्रकाश जोशी (वय २५, रा.आगवे जोशीवाडी ) हा २७ जुलै रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपली आई प्रियांका प्रकाश जोशी (वय ५२) हिला बाहेर जाऊन येतो असे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र त्यानंतर तो घरी परत आला नाही. त्यानंतर पंकजची आई व नातेवाईकांनी त्याचा आजूबाजूच्या परिसरात तसेच इतर नातेवाईकांमध्ये सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून न आल्याने अखेर याबाबत संजय विलास चव्हाण (रा.खालची कुंभारवाडी,लांजा) यांनी लांजा पोलीस ठाण्यात तो बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली आहे.
याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल जान्हवी मांजरे या करत असून या तरुणा बाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास त्यांनी तात्काळ लांजा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीसांकडून करण्यात आले आहे.