बॅ नाथ पै सेवांगणच्या मोफत शिष्यवृती वर्गातील 11 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

मसुरे | झुंजार पेडणेकर
बॅ नाथ पै सेवांगण यांच्या वतीने आयोजित मोफत शिष्यवृत्ती वर्गातील
११ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
मालवण केंद्रातील 6 व कट्टा
केंद्रातील 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
▪️मालवण केंद्र इयत्ता ४थी –
१ विराज अंकुश कनेरकर,
२ पार्थ राजेश कामतेकर
३. राजवर्धन हंबीरराव चौगले.
४. आरोही सतिश शिंदे
५ आद्या रविकिरण आपटे
६ आराध्या नारायण पराडकर

▪️कट्टा शाखा
इयत्ता ४ थी
1 भावेश संदीप सावंत
2 ऋषिकेश दिनेश पेंडूरकर
इयत्ता ७ वी
1 मनस्वी शैलेश परब
2 सेजल कृष्णा चौकेकर
३ निधी निनाद धारपवार

बॅ नाथ पै सेवांगण कट्टा शाखेच्या वतीने गेली २६ वर्ष शिष्यवृती मोफत वर्ग चालवला जातो. या २६ वर्षात
१८१ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकाले आहेत.
सेवांगणच्या मालवण विभागाच्या वतीने गेली ४ वर्षे हा वर्ग चालवला जातो या ४ वर्षात ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहे..
जुलै महिन्यात प्रवेश परीक्षा घेऊन या वर्गासाठी विद्यार्थी निवडले जातात.
दर शनिवारी व रविवारी तसेच सुट्टीच्या दिवशी हे वर्ग सातत्याने सुरू असतात. फेब्रुवारी अखेर पर्यंत हे वर्ग असतात
मालवण विभागात मनाली वेंगुर्लेकर व
नेहा हुनारी, कट्टा शाखेत मनोज काळसेकर व इतर शिक्षक मार्गदर्शक म्हणून काम पाहतात.
हे वर्ग पूर्णप्रणे विनामूल्य आहेत.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे ॲड देवदत्त परुळेकर, किशोर शिरोडकर,शैलेश खांडाळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर यानी सेवांगणच्या वतीने व ज्योती तोरसकर, दीपक भोगटे, मनाली वेंगुर्लेकर, नेहा हुनारी, मनोज काळसेकर यानी शिष्यवृती विभागाच्या वतीने अभिनंदन केले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित
सत्कार करण्यात येणार आहे.