देवरूख (प्रतिनिधी):
👉 आज शुक्रवारी पहाटे ४ वाजताची खळबळजनक घटना
👉 कोंबड्यांसाठी बिबट्या घुसला घरात, कोंबड्या केल्या फस्त
👉 याचवेळी बिबट्याच्या हल्ल्यात प्रतिभा प्रकाश दळवी (वय-६०) जखमी
👉 प्रतिभा दळवी यांनी घरात अर्धातास केला बिबट्याशी सामना
👉 त्यांनी समयसूचकता, धाडस दाखवत घराचा पुढील दरवाजा उघडल्याने बिबट्याने घरातून जंगलात ठोकली धूम
👉 प्रतिभा यांना उपचारासाठी तत्काळ देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल
👉 अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्ह्या रुग्णालयात दाखल केले
👉 वांझोळे ग्रामस्थांसह देवरूखचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड रुग्णालयात दाखल
👉 वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी













