मिरजोळे-पडवेवाडी, कोकणनगर येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळणार्‍या दोघांविरोधात गुन्हा दाखल

crime jugar

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरातील मिरजोळे-पडवेवाडी आणि कोकणनगर येथे बेकायदेशिरपणे जुगार खेळ चालवणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.40 ते 8.15 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
साहिल बाळाराम ब्रिद आणि अन्वर मलिक रिफाई अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोनही संशयितांची नावे आहेत.शुक्रवारी सायंकळी शहर पोलिस मिरजोळे आणि कोकणनगर येथे गस्त घालत असताना त्यांना मिरजोळे येथील प्रिन्स बारच्या बाजुला असलेल्या बंद टपरीत साहिल तर कोकणनगर येथील क्रांतीनगर दर्ग्याजवळ अन्वर हे दोघे मुंबई मटका जुगाराचे साहित्य जवळ बाळगून स्वतःच्या फायद्यासाठी जुगार चालवत असताना मिळून आले.त्यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.