जयगड खंडाळा नाका येथील सरकारी देशी दारु दुकानाबाहेर मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या दोघांवर कारवाई

 

रत्नागिरी ः प्रतिनिधी : तालुक्यातील जयगड खंडाळा नाका येथील सरकारी देशी दारु दुकानाच्या ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत सापडून आलेल्या दोघांवर जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई शुक्रवार 18 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.15 वा.करण्यात आली.
सुरेश गोपाल कदम आणि संजय महादेव ढवळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत.शुक्रवारी सायंकाळी जयगड पोलिस खंडाळा परिसरात गस्त घालत असतान तेथील सरकारी देशी दारु दुकानात दोन्ही संशयित मद्यधुंद अवस्थेत मिळून आले.त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.