वेंगुर्ले : प्रतिनिधी
“गरीबांची घरे सुस्थितीत ठेवणे” या योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात तुळस गावातील ३ गरजू लाभार्थ्यांना घरदुरुस्तीसाठी प्रत्येकी २०,००० रुपये असे एकूण ६०,००० रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाच्या धनादेशांचे (चेक) वाटप सभापती शंकर घारे यांच्या हस्ते करण्यात आले.
तुळस गावातील श्री. सुभाष लक्ष्मण मांजरेकर, श्री. राकेश प्रभाकर बेहेरे व ज्योती जयवंत पालयेकर यांना हे अनुदान मंजूर झाले आहे. धनादेश वितरण प्रसंगी सरपंच सौ. रश्मी परब, उपसरपंच श्री. नारायण कुंभार, ग्रामसेवक श्री. चव्हाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. सचिन नाईक व श्री. जयवंत तुळसकर उपस्थित होते.













