आबलोली येथील श्रीश सुर्वे आणि अद्वैत ढवळ या दोन विद्यार्थ्यांची नागपूर येथे राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड

आबलोली वार्ताहर: 
गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोली या शाळेतील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेला कुमार श्रीश स्वप्नील सुर्वे आणि चंद्रकांत बाईत माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय आबलोली या शाळेत इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेला कुमार अद्वेत वैभव ढवळ या दोन्ही विद्यार्थ्याची नागपूर येथे होत असलेल्या 14 वर्षा खालील वयोगटातील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट संघामध्ये मध्ये निवड झाली आहे. या निवडी बद्दल या दोघा विद्यार्थ्यांचे आबलोली गावातून अभिनंदन करण्यात येत असून दोन्ही विद्यार्थी डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत.
आबलोली गावातील दोन्ही विद्यार्थी जिल्ह्याच्या संघातून राज्यस्तरीय 14 वर्षाखालील वयोगटातून टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत आबलोली गावाचे नेतृत्व करत असल्यामुळे दोन्ही विद्यार्थ्यांचे आबलोली गावाच्या वतीने विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय स्तरातून अनेक मान्यवरांनी अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.