लांजा (प्रतिनिधी): पीएमश्री जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं. १ येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.
शाळेच्या गुरुवर्य सुभाष पांडुरंग शेट्ये सर सभागृहात आयोजित या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती सौ. मानसी आंबेकर आणि जिल्हा परिषद सदस्या सौ. मनीषा लाखण या उपस्थित होत्या.शाळेच्या वतीने उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले. त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील आराध्या निमकर्डे( तालुक्यात द्वितीय), चैतन्या कांबळे (तालुक्यात तृतीय) तसेच नवोदय विद्यालय साठी निवड प्राणेश माळी, इयत्ता ४ थी.शिष्यवृत्ती परीक्षेतील अस्मि लिंगायत -तालुक्यात २ री, वेदीका माळी- तालुक्यात १३ वी या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन विशेष गौरव करण्यात आला:
यावेळी मार्गदर्शन करताना पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी यूपीएससी व एमपीएससी चे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून स्पर्धा परीक्षांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा,” व आपले उज्वल भवितव्य घडवावे. जि. प. सदस्या
सौ. मनीषा लाखण यांनी”विद्यार्थ्यांनी स्वतःपासून आरंभ करावा. यशासाठी सातत्यपूर्ण परिश्रम आणि जिद्द आवश्यक आहे. जि. प. च्या ‘आरंभ’ उपक्रमाविषयी माहिती देत त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,” असे आवाहन केले.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा कुलकर्णी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश लांजेकर, उपाध्यक्षा अर्चना लांजेकर, लांजा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, केंद्रप्रमुख सौ. अर्चना पेणकर, माजी गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत पावसकर, व्य. स. सदस्य राजेश लांजेकर यांच्यासह सर्व समित्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक दत्ताराम गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ.वैशाली कदम यांनी मानले.













