कलमठ मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ.
पालकमंत्री नितेश राणे यांना आज आमदार म्हणून १२ वर्षे पूर्ण होत असून आजच्या दिवशी कलमठ मध्ये विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. कलमठ कुंभारवाडी वृंदावन कॉलोनी, कलमठ बौद्धवाडी रस्ता खडिकरण डांबरीकरण कामांचा शुभारंभ जिल्हापरिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. १२ वर्षे नितेश राणे यांनी आमदार म्हणून कणकवली मतदारसंघाला न्याय दिलाच तेवढेच प्रेम कायम कलमठ गावावर करून विविध विकास कामांना निधी उपलब्ध करून गावाच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना दिली, मंत्री म्हणून २ वर्षात केलेलं काम कौतुकास्पद असून राज्याच्या आणी जिल्ह्याच्या विकासासाठी मेहनत असून त्यांच्या मेहनतीला नेहमी यश मिळो अशी सदिच्छा सरपंच संदिप मेस्त्री यांनी व्यक्त केली.
यावेळी पंचायत समिती सदस्य गुरुनाथ वर्देकर,, उपसरपंच रवींद्र यादव, महेश लाड, सदस्य स्वप्नील चिंदरकर, दिनेश गोठणकर ,श्रेयस चिंदरकर, इफत शेंख, नजराणा शेंख, नितीन पवार, अनुप वारंग, अशोक कदम, किशोर कदम, शकील शेंख, स्वाती नारकर, सुनील कदम, गंगाधर कदम, शैलेश कदम, महेंद्र कदम, सागर कदम,मिलिंद चिंदरकर, रमेश कदम, नंदकुमार कासले,शानू शाह प्रशांत कदम उपस्थित होते.
प्रास्ताविक किशोर कदम सर यांनी केले स्वागत गंगाधर कदम, अशोक कदम यांनी केले.













