▪️राकेश परब यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजन
मसुरे | झुंजार पेडणेकर :
मालवण तालुक्यातील चुनवरे गावचे सुपुत्र, राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांच्या वाढदिवसा निमित्त विरण बाजारपेठ येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले होते. या शिबिरात २७ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर आणि राकेश परब यांच्या शुभहस्ते पार पडले.
उद्घाटनप्रसंगी अनिल कांदळकर म्हणाले, अशा प्रकारे रक्तदान शिबिरासारख्या सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करणे अत्यंत भूषणावह आहे. एका व्यक्तीचे रक्तदान हे कोणाचे तरी जीवन वाचवू शकते. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश परब हे सदैव जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याला आणि भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मसदे सरपंच सौ. शमिका वाडकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, विरण सोसायटी अध्यक्ष रामदास पांजरी, माजी सरपंच आपु आंबेरकर, मालोंड माजी उपसरपंच जितेंद्र परब, बाबू आंगणे, किरण प्रभू, राजेश पाटील, देवेश नारकर, विशाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग रक्तपेढीच्या डॉ. उन्नती लडकत, सुमंगल बगडे, सौरभ शिंदे, जोसेफ पिंटो, जान्हवी तायशेट्ये, श्रीम. काजल परब, मिलिंद कांबळे, सागर सावंत, प्रथमेश घाडी, नितीन गावकर, दिनेश आंगणे, सचिन आंगणे, अरुण मेस्त्री, श्री. धुरी, मोहन पांजरी, बापू माड्ये, गणेश नेरूरकर, राजू बेलवलकर, प्रवीण पांजरी, सिद्धेश माड्ये, संतोष मुणगेकर, मनिष परब, बाबू वाडकर, बाळू जंगले, मुकेश नार्वेकर, प्रकाश परब, बाळा परब, संतोष घाडीगावकर, दिपक भोगले, राजू परब, एकनाथ परब, संदिप सावंत, महेश पालव, विजय सकपाळ, भाई घाडीगावकर, अनिल पालव यांच्यासह अनेक रक्तदाते, रिक्षा संघटना सदस्य आणि राकेश परब मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांचे राकेश परब यानी आभार मानले.













