पालघर : प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून, पश्चिम रेल्वेने अहमदाबाद–मंगळुरू–अहमदाबाद साप्ताहिक विशेष गाडीला पालघर स्थानकात अतिरिक्त थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा २८ ऑगस्ट २०२६ पासून लागू होणार आहे.
गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद जंक्शन–मंगळुरू जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी पालघर स्थानकावर रात्री १० वाजून ०२ मिनिटांनी पोहोचून १० वाजून ०४ मिनिटांनी पुढे रवाना होईल.
तर गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरू जंक्शन–अहमदाबाद जंक्शन साप्ताहिक विशेष गाडी पालघर स्थानकावर सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पोहोचून ७ वाजून १२ मिनिटांनी पुढे रवाना होईल.
पालघर येथे या दोन्ही दिशेच्या गाड्यांना प्रत्येकी दोन मिनिटांचा थांबा मिळणार आहे. त्यामुळे पालघर परिसरातील प्रवाशांना या विशेष रेल्वे सेवेचा लाभ घेता येणार आहे.
या गाड्यांचे सविस्तर थांबे व वेळापत्रक प्रवाशांनी अधिकृत रेल्वे चौकशी संकेतस्थळावर तपासावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.












