राजापूर | प्रतिनिधी : शहरातील मधीलवाडा येथील रहिवशी कमालुद्दीन दाऊद वाडकर वय ७५ वर्ष, हे कोल्हापूर येथे सापडले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी कोल्हापूर बस स्थानकावरून त्यांना ताब्यात घेतले आहे. वाडकर हे दिनांक रविवार २३ ऑगस्ट पासून नापत्ता होते. रविवारी सकाळी घरात कुणालाही काही न सांगता ते घरातुन निघून गेले आहेत. या प्रकरणी त्यांच्या नातेवाईकांनी राजापूर पोलीस स्थानकात खबर दिली होती. यानंतर पोलीस व वाडकर यांच्या नातेवाईकांकडून त्यांचा शोध सुरू होता. विविध ठिकाणी त्यांचे नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
दरम्यान वाडकर हे कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकात आढळून आले आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना राजापूरात आणले असून याबाबत राजापूर पोलीसांना माहिती देण्यात आली आहे.













