Ratnagiri Cyber Crime News: मारुती मंदिरातील प्रौढाच्या खात्यातून 55 हजार 400 रुपयांची ऑनलाईन फसवणूक

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील मारुती मंदिर येथील प्रौढाची अज्ञाताने ऑनलाईन पध्दतीने 55 हजार 400 रुपयांची फसवणूक केली. फसवणूकीची ही घटना 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7 वा.सुमारस घडली आहे.

राजेश सखाराम आंबेकर (45,मुळ रा.आंबेड संगमेश्वर सध्या रा.विश्वनगर मारुतीमंदिर,रत्‍नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार,2 एप्रिल रोजी अज्ञाताने त्‍यांच्या बँक खात्‍यातून तांत्रिक बाबींचा वापर करुन प्रथम 40 हजार आणि नंतर 15 हजार 400 अशी एकूण 55 हजार 400 रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4), माहिती तंत्रज्ञान अधिनियम कायदा कलम 66 (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.