फोटो काढणाया इसमास युवतींनी दिला चोप 

कणकवली बस स्थानकातील घटना

कणकवली : मोबाईल मध्ये चोरून फोटो काढणाऱ्या एका इसमाला महाविद्यालयात शिकणाऱ्या युवतींनी मिळून चोप दिला. ही घटना कणकवली बस स्थानकात आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. येथील महाविद्यालयात जाणाऱ्या युवती विद्यार्थ्यांनी बस स्थानकात बसची वाट पाहत थांबल्या होत्या. त्याच वेळी देवगड तालुक्यातील एक ५० वर्षीय इसम त्यांच्यासमोर बसून आपल्या मोबाईल मध्ये त्यांचे चित्रीकरण करत होता. ही बाब त्यातील एका मुलीच्या लक्षात आल्यावर तिने याबाबत हटकले आणि चोप देण्यास सुरुवात केली. बस स्थानकातील सुरक्षा रक्षकांनीही त्याला चोप देत पोलिसांना बोलावले. हा व्यक्ती मद्यपान करून होता. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्या व्यक्तीचा मोबाईल तपासला असता त्याच्या मोबाईल मध्ये चोप देणाऱ्या युवतींसह अन्य ठिकाणी रेल्वे आदींमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ आढळले आहेत. या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.