अज्ञात इसमाचा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यु, ओळख पटविण्यासाठी राजापूर पोलीसांचे संपर्क साधण्याचे आवाहन

राजापूर प्रतिनिधी: जिल्हा शासकिय रूग्णालयात उपचार सुरू असताना मयत झालेल्या अज्ञात व्यक्तीची व नातेवाईकांची ओळख पटविण्याबाबत राजापूर पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन राजापूर पोलीसांनी केली आहे.
राजापूर पोलीस ठाणे अकस्मात मृत्यु रजि नं ५४/२०२६ भा.ना.सु.सं.क १९४ मधील अज्ञात मयत याचेवर सिव्हील हॉस्पीटल रत्नागिरी येथे दि.१९/०८/२०२६ रोजी पासुन उपचार सुरु असताना ते दि.२४/०८/२०२६ रोजी १३.१६ वा चे दरम्याने मयत झाले. याबाबत अ.मृ रत्नागिरी शहर पोलीस ठाणे येथे ००/२०२६ ने दाखल होवून टपालद्वारे सदरची कागदपत्रे राजापूर पोलीस ठाणे येथे प्राप्त झाल्याने सदरचा अ.मृ हा दि.२६/०८/२०२६ रोजी १०.४६ वा रजि दाखल करण्यात आलेला असून सदर गुन्हयाचा तपास आम्ही स्वतःकरीत आहोत. मयताचे नाव राजन भिकाजी सावंत असे असल्याचे प्राथमिक चौकशीतून दिसून येत असून त्यांचा पत्ता मिळून येत नाही.
तरी सदर व्यक्ती नेमकी कोण कुठले काय माहित असेल अथवा या मयताचे नातेवाईक असतील तर त्यांनी राजापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन राजापूरच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांनी केले आहे. यासाठी दिपज्योती पाटील मोबा. 9619402605, राजापूर पोलीस ठाणे संपर्क 9684708311 यावर संपर्क साधावा असे आवाहन राजापूर पोलीसांनी केले आहे.
फोटो अज्ञात इसम