दोडवली ग्रामस्थांच्या वतीने मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा सत्कार

पाटपन्हाळे (योगेश तेलगडे) गुहागर तालुक्यातील नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्याची दुरावस्था झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्ती साठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा दोडवली ग्रामस्थांच्या वतीने दोडवली शाळा येथे सत्कार करण्यात आला.
नरवण वाघांबे दोडवली मासू रस्त्यावरून प्रवास करणे जिकरीचे झाले होते. रस्त्याला जागोजागी खड्डे पडलेले असल्याने रस्त्यावरून प्रवास करण्यास वाहनधारक तयार होत नव्हते, आजारी रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी सुद्धा वाहनचालक तयार होत नव्हते अशी रस्त्याची स्थिती झाली होती येथील नागरिकांनी अनेकवेळा शासनदरबारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडे अर्ज, विनंत्या निवेदने दिली, नागरिकांना कुणीही न्याय देऊ शकले नाहीत अखेर ग्रामस्थांनी मनसे गुहागर ता.संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्याकडे केली. अखेर प्रमोद गांधी यांनी पंचायत समिती, जि.प. ग्रामपंचायत यांच्याकडे रस्त्याच्या दुरूस्तीची मागणी केली, कोणीही यासाठी निधी देवु शकले नाहीत.ग्रामस्थांची होणारी अडचण लक्षात घेता स्वखर्चाने जेसीबी, पाण्याचा टँकर, डम्पर, रोलर यासाठी आर्थिक सहकार्य केले होते .तसेच अंगमेहनत करणाऱ्या ग्रामस्थांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती, ग्रामस्थांनीही श्रमदानाने या रस्त्याच्या दुरूस्ती साठी मेहनत केली होती. या रस्त्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या मनसे गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचा दोडवली गावाच्या वतीने भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.या सत्कारासाठी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनिल हळदणकर,तालुका सचिव श्रीराम विचारे, माजी सभापती दत्ताराम निकम, संतोष रामगडे, सहसंपर्क अध्यक्ष सुरेंद्र निकम, संजय हुमणे, अशोक कांबळे, शाखाध्यक्ष सचिन निकम अंकुश निकम, प्रमोद निकम, प्रशांत साटले, अमित खोडेकर, नितीन कारकर, जितेंद्र साळवी, शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, तसेच दोडवली गावातील ग्रामस्थ मनसे सैनिक, शिक्षक उपस्थित होते.