आंबडस विद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा

चिपळूण (प्रतिनिधी) : न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज आंबडस येथे १२ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन समाजातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शिक्षक रुपेश धाडवे यांनी लोकसंख्या दिनाचे महत्त्व, उद्दिष्टे आणि लोकसंख्येच्या वाढीमुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक, आर्थिक व पर्यावरणीय समस्यांविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक राजेंद्र बांबाडे यांनी तर शिक्षिका रजनीगंधा पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या प्रसंगी मुख्याध्यापक वसंत यादव, इतर शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रश्नाबाबत जागरूकता निर्माण केली.