राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी यांच्या निधनाने मन हेलावले

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज परब यांचे योगदान आणि आठवणी सदैव स्मरणात राहतील : आमदार निलेश राणे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मालवण | प्रतिनिधी : १९९० पासून राणे साहेबांच्या सोबत निष्ठेने काम करणाऱ्या ज्येष्ठ सहकारी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सरोज शिवाजी परब यांच्या आकस्मिक निधनाने मन हेलावून गेले, त्यांचे योगदान आणि आठवणी सदैव स्मरणात राहतील. सरोजताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. अशा शब्दांत कुडाळ-मालवण मतदारसंघाचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सरोज परब यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.