जबलपूर-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला नियमित गाडीचा दर्जा

जबलपूर-कोईम्बतूर साप्ताहिक एक्स्प्रेसला नियमित गाडीचा दर्जा

२३ ऑक्टोबरपासून नवी गाडी सुरू; कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, कणकवली, कुडाळसह अनेक स्थानकांवर थांबा

कोकण : प्रवाशांसाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून महत्त्वाची बातमी आहे. जबलपूर जंक्शन-कोईम्बतूर जंक्शन-जबलपूर जंक्शन विशेष गाडी क्रमांक ०२१९८/०२१९७चे नियमित गाडी क्रमांक २०१६०/२०१५९ एक्स्प्रेसमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. ही गाडी आता साप्ताहिक स्वरूपात नियमित धावणार आहे.

ट्रेन क्रमांक २०१६० जबलपूर-जंक्शन ते कोईम्बतूर एक्स्प्रेस दर शुक्रवारी रात्री ११.५० वाजता जबलपूरहून सुटणार असून, २३ ऑक्टोबर २०२६पासून तिची नियमित सेवा सुरू होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सायंकाळी ५.१० वाजता कोईम्बतूर जंक्शनवर पोहोचणार आहे.

तर ट्रेन क्रमांक २०१५९ कोईम्बतूर-जबलपूर एक्स्प्रेस दर सोमवारी सायंकाळी ५ वाजता कोईम्बतूरहून सुटणार आहे. या गाडीची सेवा २६ ऑक्टोबर २०२६पासून सुरू होईल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ८.४५ वाजता जबलपूर जंक्शनवर पोहोचणार आहे.

कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा

या एक्स्प्रेसला पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिवीम आणि मडगाव यांसह अनेक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे कोकणातील प्रवाशांना जबलपूर तसेच दक्षिण भारतातील कोईम्बतूरकडे जाण्यासाठी या गाडीचा फायदा होणार आहे.

 

गाडीचे इतर प्रमुख थांबे नरसिंहपूर, गाडरवारा, पिपरिया, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, नाशिक रोड, मडगाव, कारवार, कुमटा, मूकांबिका रोड बायंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुळकी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कन्नूर, वडकारा, कोझिकोड, तिरूर, शोरनूर जंक्शन आणि पालक्काड जंक्शन आहेत.

 

२४ डब्यांची गाडी

नियमित करण्यात आलेल्या या एक्स्प्रेसला एकूण २४ डबे असतील. त्यामध्ये:

फर्स्ट एसी : १ डबा

टू-टियर एसी : २ डबे

थ्री-टियर एसी : ६ डबे

स्लीपर : ९ डबे

जनरल : ४ डबे

एसएलआर : २ डबे

या निर्णयामुळे कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना जबलपूर ते कोईम्बतूर दरम्यान नियमित साप्ताहिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार असून, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ परिसरातील प्रवाशांनाही त्याचा लाभ घेता येणार आहे.