३-टियर एसीचा एक डबा वाढणार; २ सप्टेंबरपासून नवीन डब्यांची रचना लागू
सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. दक्षिण मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक १७०३९/१७०४० सिकंदराबाद-वास्को द गामा-सिकंदराबाद द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेसला कायमस्वरूपी एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेच्या माहितीनुसार या गाडीचा मार्ग सिकंदराबाद ते वास्को द गामा असा आहे.
या निर्णयामुळे गाडीतील ३-टियर एसी डब्यांची संख्या पाचवरून सहा होणार आहे. सध्या या एक्स्प्रेसमध्ये एकूण १९ एलएचबी डबे आहेत. अतिरिक्त डबा जोडल्यानंतर गाडीची एकूण डब्यांची संख्या २० एलएचबी होणार आहे.
अशी असेल नवीन डब्यांची रचना
२-टियर एसी : २ डबे
३-टियर एसी : ६ डबे
स्लीपर : ६ डबे
जनरल : ४ डबे
जनरेटर कार : १
SLR/D : १
एकूण : २० एलएचबी डबे
ट्रेन क्रमांक १७०३९ सिकंदराबाद-वास्को द गामा एक्स्प्रेसला २ सप्टेंबर २०२६पासून अतिरिक्त डबा लागू होणार आहे. तर ट्रेन क्रमांक १७०४० वास्को द गामा-सिकंदराबाद एक्स्प्रेसला ३ सप्टेंबर २०२६पासून नवीन डब्यांची रचना लागू केली जाणार आहे.
यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः ३-टियर एसी वर्गात अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांची सोय वाढण्यास मदत होणार आहे.













