खेड (प्रतिनिधी) खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील मुंबके या छोट्याशा गावचा सुपुत्र इमरान हमीद फकी याने
युरोपमधील ५६४२ मीटर उंचीवर असलेला एल्ब्रस पर्वत सर करत या पर्वतावर तिरंगा फडकवला
इमरान फकी हा सध्या मॅकडरमॉट, अल खोबर, केएसए येथे वरिष्ठ नियोजन अभियंता म्हणून कार्यरत आहे. इमरानचा १० ऑगस्ट २३ पासून पर्वत चढण्याचा प्रवास सुरू झाला. १० ऑगस्टला रशियाला पोहचल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने एल्ब्रस नॅशनल पार्कमध्ये अॅक्लिमेटायझेशन पायी प्रवास करत एम एस एल पेक्षा २८०० मीटरवर पोहोचला. १२ ऑगस्ट रोजी बेस कॅम्प सर केला. १३ ऑगस्टला त्याने ४२०० मीटर पर्यंत एक पुन्हा ॲक्लिमेटायझेशन वॉक केला. यावेळी बर्फात आणि एल्ब्रस पर्वताच्या तीव्र उतारावर चढताना कठीण काळ अनुभवत होता.
दरम्यान १४ ऑगस्ट रोजी पुन्हा ४७०० मीटर पर्यंत ॲक्लिमेटायझेशन पायी प्रवास करताना पश्तोखोवा रॉक्स हा उतार खूपच जास्त कठीण होता. १५ ऑगस्टला आईस अँक्सचे प्रशिक्षण, कॅराबिनरचा वापर इ. करून १६ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजता सर्व गियर ऑन करून बेसकॅम्पपासून सुरुवात केली.
उणे २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ५१०० मीटर उंच चढाईची सुरुवात थंड झाली होती मार्गदर्शक श्री पासांग लामा यांच्याशी नियमित अंतराने संपर्क व मार्गदर्शन मुळे ६ तासांच्या नॉनस्टॉप चढाईनंतर आणि सूर्योदय ५.१५ पर्यंत उणे २५ अंश तापमानाशी झुंज देऊन सकाळी ६.३० च्या सुमारास शिखरावर पोहोचलो, असे इमरान सांगतो.
यापुढे तो म्हणाला की, अल्लाह आमच्यावर इतका दयाळू होता कारण संपूर्ण रात्र ढग किंवा कडक वारा नसलेली शांत होती. शिखरावर मात्र प्रचंड वारा वाहत होता. फोटो काढण्यासाठी १५ मिनिटेही देऊ शकलो नाही. सर्वात कठीण भाग म्हणजे बेसकॅम्पवर सुरक्षितपणे उतार असलेल्या ठिकाणी उतरण्याचा होता. रात्री १२ वाजता बेसकॅम्पला पोहोचायला ५ तास लागले. १२ तासांची नॉन-स्टॉप चढाई आणि अत्यंत वातावरणात परतणे खरोखर कठीण होते. मात्र तरीही यशस्वी पर्वत सर केले. शिखरावर पोहोचण्यासाठी धैर्य आणि समर्पण आवश्यक असल्याचे इमरान आवर्जून सांगतो.
५६४२ मीटर उंचीवर युरोपमधील सर्वोच्च पर्वत यशस्वीपणे सर करण्यासाठी , कमी ऑक्सिजनशी लढण्यासाठी गेल्या ३ महिन्यांत मार्गदर्शन केले, जलतरण प्रशिक्षक असगर भाई, आयोजक आनंद बनसोडे (३६० अन्वेषक) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले इतक्या उंचीवरून जाऊन युरोप च्या सर्वाधिक पर्वतावर तिरंगा फडकवणे अभिमान चे असल्याचे इमरान याने सांगितले











