राज्यस्तरीय स्काऊट, कब व बुलबुल चाचणी परीक्षेत सहभागी होणारी सिंधुदुर्गातील पहिली प्राथमिक शाळा
सावंतवाडी : जि. प. पू. प्राथमिक शाळा आंबेगाव नं. १च्या ‘शिवरत्न संभाजी कब पथका’ने राज्यस्तरीय चतुर्थ चरण कब चाचणी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मार्च २०२६ मध्ये सोनतळी, कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय चाचणी परीक्षेत इयत्ता तिसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याचे, शिस्तीचे व आत्मविश्वासाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
शाळेचे कब मास्टर श्री. नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कु. मयंक महादेव निरुकेकर, नितेश नामदेव शेळके, शौर्य सावळाराम जाधव, स्वरूप न्हानू आंगचेकर, सचिन सुमित दळवी, यज्ञेश उमेश गवळी, चैतन्य उत्तम सावंत आणि स्वराज प्रदीप सावंत या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय कब चाचणी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली.
याचबरोबर शाळेच्या बुलबुल पथकातील कु. प्रिया शंकर राणे, त्रिशा तेजस गावडे आणि समृद्धी सचिन चव्हाण यांनीही राज्यस्तरीय चतुर्थ चरण बुलबुल चाचणी परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली. या विद्यार्थिनींना फ्लॉक लीडर श्रीमती निता नितीन सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच राज्यस्तरीय स्काऊट राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत शाळेचे स्काऊट मास्टर श्री. नितीन नामदेव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कु. तनिश तेजस गावडे, प्रविण सिताराम जंगले, भावार्थ नवलू झोरे आणि आर्यन रवि गावडे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
विशेष म्हणजे, यावर्षी राज्यस्तरीय स्काऊट, कब आणि बुलबुल या तिन्ही चाचणी परीक्षांमध्ये सहभागी होणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली प्राथमिक शाळा होण्याचा मान आंबेगाव शाळा नं. १ने मिळविला आहे. या कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक तसेच सहशालेय उपक्रमांतील उल्लेखनीय योगदानाची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना स्काऊट-गाईड जिल्हा संघटक श्रीमती अंजली माहुरे, स्काऊट मास्टर श्री. अरविंद मेस्त्री आणि श्री. प्रदीपकुमार म्हाडगुत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
शाळेच्या या राज्यस्तरीय उल्लेखनीय यशाबद्दल कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संदीप निऊंगरे, आंबेगाव सरपंच श्री. शिवाजी परब, उपसरपंच श्री. रमेश गावडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा श्रीमती तेजस्वी गावडे, उपाध्यक्ष श्री. संदेश कारिवडेकर, शिक्षणतज्ज्ञ श्री. राहुल राणे, पोलीस पाटील श्री. लक्ष्मण गावडे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. संतोष राणे, ग्रामपंचायत सदस्य श्री. योगेश गवळी, श्रीमती साक्षी राऊळ, श्रीमती प्रणाली परब, ग्रामसेवक श्री. जाधव, शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रदीपकुमार म्हाडगुत, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले आहे.













